मंगळसूत्र गरजेचं वा पुरेसं नसतं!

 


" प्रतिकांची निर्मिती " हे मनुष्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. पण त्या प्रवसातलं पुढचं पाऊल आपल्याला अजून टाकता आलेलं नाही. 


आपल्याला न सुटलेल्या कोड्याचा धनी म्हणून आपण ' ईश्वर ' नेमला, मग त्याची मूर्ती बनवली - त्याला सगुण - साकार केलं, म्हणजे प्रतीक तयार केलं.  त्याच्यासमोर नम्र होण्यासाठी ' नमस्कार ' करून प्रतीकात्मक नात नतमस्तक झालो. पुजे- अर्चेच्या नावाने भक्ती केली. भक्तीच्या नावाने कर्मकांडं! हेही पुन्हा प्रतिकच. 


अजूनही आपल्याला प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाची गरज का भासावी ?


आपण हुशारीचं प्रतीक डिग्र्यांना मानतो, श्रीमंतीचं प्रतीक सोना- नाण्याला..
पुरस्कारांची प्रतिकं असतात, अपमानासाठी चपलांचा हार असतो ! गळ्यात मंगळसूत्र - प्रतीकाचं , डोक्यावर टोपी - कोणाच्यातरी नावाची, झेंडे - वेगळ्या रंगाचे, वेगळ्या जातीचे -

ईश्र्वराशी भक्ती, माणसावरचं प्रेम, आदर, विश्वास, कौतुक यासाठी आपण वापरत असलेली प्रतिकं आणि याशिवाय  जगण्यामधली वस्तूंची निखळ गरज यामधलं वेगळेपण आपल्याला अजून समजत नाही.

म्हणजे गळ्यातलं मंगळसूत्र नवरा बायकोंमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण करण्यासाठी गरजेचं वा पुरेसं नसतं, हे अजून कळलं नाही आपल्याला ?


प्रतीकांची गरज मला का भासावी ? माझ्या आचरणातून माझ्या अंतरंगात भिनलेली भक्ती, प्रेम, निष्ठा का दिसू नये?
"प्रतिकांशिवाय व्यक्त होणे" हे ते पुढचं पाऊल होऊ शकेल काय?


1 टिप्पणी: