तो गुंड आहे, माहिती आहे. त्याचे डोळेच सांगतात की तो क्रूर, कोल्ड
ब्लडेड आहे. अनेक गुन्ह्यांचा तो कर्ताधर्ता आहे. पण कोर्टात काही सिद्ध होणार
नाही हेही तितकंच खरं आहे. पण तरी सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती असतंच.
गावात त्याची चौथाई आहे. पूर्वी तो लपून छपून गोष्टी करायचा. आता तो खिशात कायदा
घेऊन फिरतो.
पण आम्ही विरोध करत नाही, डोळेझाक करतो.. का माहिती आहे? कारण तो माणूस आमच्या बाजूचा आहे. उद्या टोकाची परिस्थिती निर्माण झाली ना तरी तो आम्हाला काही करणार नाही. आम्ही त्याच्या नात्यातले आहोत ना.
पूर्वी आपण गुंडांविरुद्ध उभे राहिलो. चांगलं केलं. पण आता गरज नाही.
कारण हा गुंड आपल्या बाजूचा आहे. म्हणून आपण याचे बाजूचे झालो. चांगलं केलं.
असा माणूस असू नये हे खरं, पण
तो जर आपल्या बाजूचा असेल तर त्याच्यासारखं सुख नाही. तो असला म्हणजे आपण अनवेअर-इग्नोरंट
राहायला मोकळे. त्याच्या जीवावर माज करायला मोकळे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा