मी कात टाकती आहे हळूहळूू
आणि अंतर्बाह्य बदलतीय हळूहळू
तुझा मात्र काळा कोट, टोपी
खुंटीवर अजूनही....
मी माझ्या आई सारखी नाही,
मी तुझ्या आई सारखी देखील नाही,
तू मात्र आजीच्या आठवणीतल्या
आजोबांसारखा..
माझ्यासाठी फिरत राहिलं
भिंतीवरचं घड्याळ,
तुझा लोलक हिप्पोक्रसीची
किल्ली संपली की बंद पडणारा...
माझा १५व्या मजल्यावरच्या
हौसेनं सजवलेला फ्लॅट -
आणि तरी त्या फ्लॅटच्या
मेन डोअरशी तुला दिसतो
एक उंबरा- मोठ्ठाच्या मोठ्ठा
रांगोळीनं स्वस्तिक काढून
हळदी कुंकू घातलेला....
लोक, रुढी, परंपरा...
तुझं समाजमान्य नवरेपण,
माझं मी मानलेलं बायकोपण,
याहून पलीकडे तुला मी कधी
तुझी मैत्रीण वाटलेच नाही ?
स्वतः तल्या मित्रावर मात
करणाऱ्या स्वतः तल्या
नवऱ्यातलं नामर्दपण
झाकण्यासाठी तू करत
राहिलास अभिलाषा
मुलगा होण्याची .. वंश वाढण्याची ..
तू माझा होऊ शकला नाहीस..
स्वतः वाढू शकला नाहीस...
तुझ्या जगण्याच्या चिखलानं
धोपट मार्गावर वाढली
फक्त एक level _,
Level च नसलेली......
(माझ्या ब्लॉगचे नोटीफिकेशन मिळत राहण्यासाठी मेल आयडी देऊन सबस्क्राईब करा)

क्या बात है...मस्तच मृद्रा
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवामार्मिक
उत्तर द्याहटवाKhup Chan madam ,an eye opener to all husbands
उत्तर द्याहटवा